दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे. सिसोदिया यांच्यासहित १३ जणांविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे तसेच सिसोदिया यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर आणि अन्य ३० ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. १४ तासांच्या छाप्यानंतर सीबीआयकडून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली.
( हेही वाढ : ताम्हिणी घाटात भीषण अपघात; गाडी २०० फूट उंचावरून कोसळली, ३ जणांचा मृत्यू)
सिसोदियांनी फेटाळले आरोप
छापेमारीनंतर सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. राजकीय सूडापोटी छापेमारी करण्यात आल्याचा दावा सिसोदिया यांनी केला होता. आता लुकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याने सिसोदिया यांना देश सोडून बाहेर जाता येणार नाही. तसे केल्यास त्यांना अटक होऊ शकते.
दरम्यान, या प्रकरणात सीबीआयने १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सिसोदिया यांचा आरोपी क्रमांक १ असा उल्लेख करण्यात आला असून त्यांच्यावर पीसी अधिनियम १९८८ अंतर्गत 120बी,477ए याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community