ज्येष्ठांना डावलून ‘मर्सिडीज बॉय’ला मंत्री केलं, पुत्रप्रेम संपत नव्हतं अन् सत्तेची खुर्ची सुटत नव्हती; चित्रा वाघांचा टोला

117

देवेंद्र फडणवीस हे सत्ताप्रेमाने आंधळे झालेले कलियुगातील धृतराष्ट्र आहेत अशी टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केल्यावर आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी त्यांना प्रतिउत्तर दिले आहे.

( हेही वाचा :  मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ; लुकआऊट नोटीस जारी, देश सोडण्यास मनाई)

काय म्हणाल्या चित्रा वाघ ?

पुत्रप्रेमात आंधळा झालेला धृतराष्ट्र कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनं मागील अडीच वर्षात पाहिल आहे. शिवसेनेतील ज्येष्ठांना डावलून ‘मर्सिडीज बॅाय’ला मंत्री केलं आणि वडील स्वतः मुख्यमंत्री बनले. पुत्रप्रेम संपत नव्हतं अन् सत्तेची खुर्ची सुटत नव्हती. शेवटी पक्षातच महाभारत घडलं अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

धृतराष्ट्रानं डोळ्यावरची पट्टी काढावी…

शेवटी पक्षातच महाभारत घडलं.आता तरी धृतराष्ट्रानं डोळ्यावरची पट्टी काढावी… डोळ्यासमोरील ‘अंधार’ दूर करावा. कित्येक घटना डोळ्यांसमोर आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत वार करण्याची एकही संधी शिवसेनेतील कंसानं आजवर सोडली नाही, आता तर भ्याडपणे पुतणा मावशीला पुढे केलंय. अशा कितीही पुतणा मावशी अंगावर पाठवल्या तरी जनतेचा हा कृष्णरूपी देवेंद्र सर्वांना पुरून उरणार नुकतंच अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेल्यांनी हे लक्षात ठेवावं असा इशारा चित्रा वाघ यांनी ट्वीट करत दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.