…तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, गुलाबराव पाटील यांनी स्पष्टचं सांगितलं

119

एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेला मी पहिला आमदार नसून माझ्याआधी ३२ आमदार गेले होते. मी उद्धव ठाकरेंना भेटूलो त्यात आमदारांच्या नाराजीविषयी सांगितलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी थोडा तह केला असता तर ही वेळ आली नसती असे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर फिरले असते तर ही वेळ आली नसती. तेव्हा ३२ वर्षांचे तरूण राज्यभर फिरू शकले असते त्या काळातील अपेक्षा ते आज पूर्ण करत आहेत परमेश्वर त्यांचे भल करो असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

…तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती 

३२ आमदार फुटल्यानंतर मी उद्धव ठाकरेंना भेटलो. त्यांच्यासमोर आमदारांचे म्हणणं मांडल ते निर्णय घेतील अशी अपेक्षा होती पण त्यांनी तसे केले नाही त्यामुळे मला इतर आमदारांसोबत जावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही युद्धामध्ये तह केला होता, उद्धव ठाकरेंनीही तह केला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती तसेच यावेळी गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवरही टीका केली. त्यांनी राज्यभर फिरायला हवं अशी तेव्हा आमची अपेक्षा होती ती आता ते पूर्ण करत आहेत. देव त्यांचं भलं करो असे ते म्हणाले.

आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत

एकनाथ खडसेंनी युती तोडली तुम्ही त्यांच्यासोबत आहात मग शिवसेना वाचवण्यासाठी भाजपाशी युती केली तर आम्ही गद्दार कसे आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.