माजी खासदार निलेश राणे रत्नागिरीतील बारसू सोलगाव येथे माळरानावर रिफायनरी संदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले असतान रिफायनरी आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. निलेश राणेंनी यावेळी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. रिफायनरी विरोधकांनी सर्वेक्षणासाठी त्यांना विरोध केला.
( हेही वाचा : ज्येष्ठांना डावलून ‘मर्सिडीज बॉय’ला मंत्री केलं, पुत्रप्रेम संपत नव्हतं अन् सत्तेची खुर्ची सुटत नव्हती; चित्रा वाघांचा टोला)
रिफायनरी आंदोलकांनी अडवला ताफा
तुमच्या अडचणी समजून घेऊ, विरोधाला विरोध करू नका. हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे हे सांगण्यासाठी मी आलोय. तुम्ही वेळ आणि दिवस ठरवा आपण चर्चा करूयात असे आश्वास निलेश राणेंनी रिफायनरी आंदोलकांना दिले आहे. रिफायनरी सर्वेक्षण ठिकाणी राणे गेले असताना त्यांचा ताफा आंदोलकांनी अडवला. शनिवारी पोलिसांनी स्थानिक महिला आंदोलकांना मारहाण केली असल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी यावेळी केला आहे.
यावेळी आंदोलकांच्या नेत्याला निलेश राणेंच्या कार्यकर्त्याने शिवीगाळ केली त्यामुळे स्थानिक महिला अधिक आक्रमक झाल्या. त्यानंतर निलेश राणेंनी रिफायनरी विरोधकांची माफी मागत चर्चा करून मार्ग काढू असे सांगितले.