MSRTC : गणेशोत्सवाची ‘एसटी’क काळजी; कोकणात जाणाऱ्यांसाठी २५ ऑगस्टपासून २ हजार ३१० अतिरिक्त बसेस

120

यंदा दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त मुंबई आणि उपनगरातील अनेक चाकरमानी कोकणवासीय गणपतीसा गावी जाणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ देखील सज्ज झाले आहे. गणेशोत्सवानिमित्त २ हजार ३१० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

( हेही वाचा : ज्येष्ठांना डावलून ‘मर्सिडीज बॉय’ला मंत्री केलं, पुत्रप्रेम संपत नव्हतं अन् सत्तेची खुर्ची सुटत नव्हती; चित्रा वाघांचा टोला)

२५ ते ३१ ऑगस्ट जादा बसेस

बाप्पांच्या आगमनाला अवघा आठवडा बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून २५ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जादा बसेस चालवण्यात येणार आहे. महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, समूह आरक्षणासाठी मुंबई विभागातून ६६७, पालघर विभागातून ३१३ आणि ठाणे विभागातून २८८, अशा एकूण १,२६८ बसेस सोडण्यात येणार आहेत. तर, वैयक्तिक आरक्षण करणाऱ्यांसाठी ८७२ बसेस असणार आहेत.

लालपरी सज्ज

कोकणात जाताना घाट रस्ते असल्याने अतिवृष्टी, दरड कोसळणे अशा घटना घडल्यास अथवा रेल्वे प्रवासात अडचणी निर्माण झाल्यास कोकणातील प्रमुख स्थानकांत १०० अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याबरोबरच खराब रस्ते आणि त्यामुळे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरील आगार आणि दुरुस्ती पथकामध्ये नेहमीपेक्षा प्रत्येकी किमान १० अतिरिक्त टायर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवानंतर ५ ते ११ सप्टेंबर दरम्यान कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्यांसाठी सुद्धा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

बस आगार आणि स्थानकांचा तपशील

मुंबई सेंट्रल आगार : मुंबई सेंट्रल साईबाबा, काळाचौकी, गिरगांव, कफ परेड, केनेडी ब्रीज, काळबादेवी, महालक्ष्मी

परळ आगार : सेनापती बापट मार्ग (दादर), मांगल्य हॉल (जोगेश्वरी)

कुर्ला नेहरूनगर आगार : कुर्ला नेहरूनगर बर्वे नगर/सर्वोदय हॉल (घाटकोपर), टागोरनगर (विक्रोली), घाटला (चेंबूर), डी.एन. नगर (अंधेरी), गुंदवली (अंधेरी), सांताक्रुझ (आनंदनगर), विलेपार्ले, खेरनगर वांद्रे, शीव (सायन)

पनवेल आगार : पनवेल

उरण आगार : उरण

ठाणे १ आगार : भाईंदर, लोकमान्य नगर, श्रीनगर, विटावा, नॅन्सी कॉलनी (बोरीवली), मालाड, डहाणूकर वाडी / चारकोप (कांदिवली), महंत चौक (जोगेश्वरी), संकल्प सिद्धी गणेश मंदिर (गोरेगाव)

ठाणे २ आगार : भांडूप पश्चिम व पूर्व, मुलुंड (पूर्व)

विठ्ठलवाडी आगार : विठ्ठलवाडी, बदलापूर, अंबरनाथ

कल्याण आगार : कल्याण, डोंबिवली पश्चिम व पूर्व

नालासोपारा आगार : नालासोपारा

वसई आगार : वसई

अर्नाळा आगार : अर्नाळा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.