महाविद्यालयीन मुलांना ‘बेस्ट’ सवलत! महिन्याला ५०० रुपयात करता येणार १०० फेऱ्यांचा प्रवास

143

बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना आणि दहावीनंतर बारावीपर्यंत मुलांना सवलतीचा बसपास दिला जातो. या सवलतीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी नाहीत त्यांनाही हा पास देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्ट उपक्रमाच्या अधिकाऱ्यांना दिले. यानुसार आता पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास देण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ सेफ्टी फिचर; महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित)

५०० रुपयात १०० फेऱ्यांचा प्रवास

  • या विद्यार्थ्यांना १०० फेऱ्यांचा ९९९ रुपयांचा मासिक पास ५०० रुपये सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात असल्याते बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले आहे.
  • विद्यार्थ्यांना मासिक पाससोबतच तिमाही बसपास आणि अर्धवार्षिक बसपास अनुक्रमे १ हजार ५०० व २ हजार ५०० एवढ्या किमतीला उपलब्ध असेल. या योजनेअंतर्गत बारावी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३५० रुपयात १०० फेऱ्यांचा पास मिळतो.
  • या सवलतीची अंमलबजावणी सोमवार २२ ऑगस्टपासून सुरु झालेली आहे. बेस्टच्या चलो अ‍ॅपच्या माध्यामतून विद्यार्थी सदर सवलतीसाठी अर्ज करू शकतात.

बेस्टची प्रिमियम बस

बेस्ट प्रिमियम बस सप्टेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या प्रिमियम बसमध्ये प्रवाशांना आसन मोबाईल अ‍ॅपद्वारे आगाऊ आरक्षित करता येणार आहे. या बसमध्ये उभे राहून प्रवास करण्यास बंदी असणार आहे. या सेवेत मासिक पासही उपलब्ध केला जाईल, याचे भाडे स्थिर असेल. या सेवेसाठी ४५ आसनी १०० बसगाड्या टप्प्याटप्प्याने बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. प्रवासाआधी तुम्हाला यासाठी आगाऊ आरक्षण करावे लागेल त्यासाठी मोबाईन अ‍ॅप उपलब्ध करण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.