पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्याच्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांच्यावर एक न्यायाधीश आणि दोन उच्चपदस्थ अधिका-यांना धमकावल्याचा आरोपी त्यांच्यावर करण्यात आला आहे.
20 ऑगस्ट रोजी एका जाहीर सभेत बोलताना, इम्रान खान यांनी उच्च पोलीस अधिकारी, एक महिला दंडाधिकारी, पाकिस्तान निवडणूक आयोग आणि राजकीय विरोधकांवर गुन्हे दाखल करण्याची त्यांना धमकी दिली होती. गेल्या आठवड्यात देशद्रोहाच्या आरोपखाली अटक करण्यात आलेला आपला सहकारी शाहबाज गिल याच्यांशी झालेल्या वागणुकीवरुन त्यांनी हा इशारा दिला होता.
( हेही वाचा: OBC आरक्षणाची सुनावणी पाच आठवड्यांनी लांबणीवर; विशेष खंडपीठ गठीत करणार )
इम्रान खान यांच्या भाषणांच्या थेट प्रक्षेपणावर बंदी
पाकिस्तान इलेक्ट्राॅनिक मीडिया रेग्युलेटरी अथाॅरिटीने शनिवारी इम्रान खान यांच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातली आहे. इम्रान आपल्या भाषणातून ते अधिका-यांना धमकावत आहे आणि अपशब्द बोलत असल्याचे, प्राधिकरणाचे म्हणणे आहे. मात्र, रेकाॅर्ड केलेली भाषणे प्रसारित करण्यास PEMRA ने परवानगी दिली आहे.
Join Our WhatsApp Community