छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा केली ‘त्या’ आश्वासनाची आठवण, म्हणाले…

118

माजी खासदार छत्रपती संभाजी हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन आक्रमक झाले आहेत. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर, छत्रपती संभाजी यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आश्वासनावरुन सत्ताधा-यांना जाब विचारण्यास सुरवात केली आहे. छत्रपती संभाजी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट त्यांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करुन दिली आहे. मराठा आरक्षणासाठी माझे उपोषण सुरु होते. त्यावेळी तुम्ही आश्वासनाचे कागद घेऊन आला होता. त्या आश्वासनाचे काय झाले? त्याची अंमलबजावणी कधी करणार आहात? असा सवाल छत्रपती संभाजी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.

संभाजी राजेंनी काय म्हटलंय पत्रात ?

मराठा समाजाला देण्यात आलेले शैक्षणिक व शासकीय नोक-यांमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 रोजी रद्द केल्यानंतर, समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही तत्कालीन राज्य शासनाकडे काही मागण्या केल्या होत्या. जून 2021 मध्ये राज्य शासनाने या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देऊनही पुढील कित्येक महिने त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने, सदर मागण्यांची अंमलबजावणी व्हावी, याकरता मी स्वत: फेब्रुवारी 2022 या महिन्यात आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण केले होते. माझे उपोषण सोडवण्याकरता तत्कालीन राज्य शासन व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिनिधी म्हणून आश्वासंनाचे कागद घेऊन आपण स्वत: आझाद मैदान याठिकाणी आला होतात. यावेळी आपण समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करण्याचे जाहीर आश्वासन देत असतानाच, त्या कशा पद्धतीने अंमलात आणू, हेदेखील उपस्थित समाज बांधवांपुढे सांगितले होते, असं संभाजी छत्रपती यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.