मुंबई-पुण्यातून कोकणात जाण्याऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर खास चाकरमान्यांच्या सोयीकरिता २७२ अतिरिक्त गाड्या धावणार आहेत.
( हेही वाचा : सायबर गुन्हे रोखण्यासाठी आउटसोर्सिंगची मदत घेणार, इंटीलिजन्स विभाग तयार करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस)
२७२ अतिरिक्त गाड्या
गणपतीला आता फक्त काही दिवस बाकी आहेत त्यामुळे कोकण रेल्वेने २७२ अतिरिक्त गाड्या सोडल्या आहेत. शिवाय ३२ नियमित मेमू ट्रेन चिपळूणपर्यंत धावणार आहे. जादा गाड्यांमध्ये आणखी वाढ होणार आहे. बहुतांश जादा गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून येत्या २७ ऑगस्टपासून कोकणात जाणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
प्रशासन व्यवस्था सज्ज
दरवर्षी कोकण रेल्वे एसटी महामंडळाप्रमाणेच चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम महामार्गावरून जादा गाड्या सोडते. यावर्षीही मोठ्या संख्येने कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडल्या आहेत. नियमित गाड्यांबरोबरच हॉलीडे स्पेशल तसेच अन्य गाड्यांचा समावेश आहे. कोकण रेल्वेने एसटी महामंडळाशी समन्वय साधत चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी,कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या महत्त्वाच्या स्थानकांवर उतरणाऱ्या चाकरमान्यांना त्यांच्या गावापर्यंत थेट जाण्यासाठी एसटी बसेस सोडण्याच्या सूचना केल्या आहेत. २७ ऑगस्टपासून चाकरमानी गावाला येण्यास सुरुवात होईल. दरम्यान, चाकरमान्यांच्या स्वागतासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
Join Our WhatsApp Community