मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर चौथी मार्गिका तयार करण्याबाबत विचार – फडणवीस

110
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर चौथ्या मार्गिकेचा विस्तार करण्याबाबत राज्य शासन विचार करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या महामार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी ‘इंटेलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ अंमलात आणली जाईल. या सिस्टीममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाईल. यामुळे लेन सोडून वाहतूक करणाऱ्या ट्रॉलरची माहिती तत्काळ मिळेल.
अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी यंत्रणा विकसित करण्यात येईल. या यंत्रणेत जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला जाईल. अपघात टाळण्यासाठी प्रशिक्षण आणि जनजागृती मोहीम राबवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
महामार्गावरील अपघातात झालेल्या आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना मदत मिळण्यात काही उणीवा राहिल्या का हे तपासण्यासाठीही अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. याबाबतच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात यांनी सहभाग घेतला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.