शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाती निधन झाले. याबाबत विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात चर्चा झाली. यात मेटे यांच्या चालकाच्या जबानीवर शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे आता आमदारांच्या चालकांचे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय विधिमंडळाने घेतला आहे. वाहन चालकांना बुधवार, २४ ऑगस्ट रोजी विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर चौथी मार्गिका तयार करण्याबाबत विचार – फडणवीस)
बुधवारी प्रशिक्षण
यासंबंधीची घोषणा सोमवारी, २२ ऑगस्ट रोजी परिषदेत करण्यात आली. माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघातानंतर सर्व आमदारांच्या वाहन चालकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. परिवहन विभागाच्या पुढाकाराने सर्व आमदारांच्या वाहन चालकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती आहे. बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community