‘सिसोदियांना भारतरत्न द्यायला हवा’, केजरीवालांनी तोडले अक्कलेचे तारे

147

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआयने केलेल्या कारवाईमुळे आता आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हास्यास्पद विधान केले आहे. केजरीवाल यांच्यासारख्या व्यक्तीला खरंतर भारतरत्न द्यायला हवा, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

केजरीवालांचे हास्यास्पद विधान

मनीष सिसोदिया यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यावरुन आता आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी केंद्रातील भाजप सरकावर टीका करायला सुरुवात केली आहे. सीबीआयच्या कारवाईचा निषेध करताना केजरीवाल गुजरातमध्ये बोलत होते. मनीष सिसोदिया यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे काम केले आहे. ज्यांच्याकडे संपूर्ण देशातील शिक्षण व्यवस्था सोपवायला हवी त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येत आहे.

(हेही वाचाः ‘नवीन प्लेयरला ओपनिंगला उभं करुन बाऊन्सर टाकतायंत’, लोढांचे मिश्कील विधान)

खरंतर मनीष सिसोदियांना भारतरत्न द्यायला हवा. पंतप्रधान मोदींनी सिसोदिया यांना बोलवून शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करायला हवी, असे विधान केजरीवाल यांनी केले आहे. त्यांचे हे विधान हास्यास्पद असल्याची टीका सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

सिसोदियांवर कारवाई

मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून मनीष सिसोदिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केल्यानंतर त्यांना काही संशयास्पद कागदपत्रे सापडली आहेत. त्यामुळे सिसोदिया यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून, त्यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.