जखमी गोविंदाना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत – शिंदे

157

दहीहंडी कार्यक्रमात जखमी झालेल्या गोविंदांवर शासकीय, तसेच पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात आहे. त्याशिवाय जखमी गोविंदांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत 

दहीहंडी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. दहीहंडी कार्यक्रमात जखमी झालेल्या गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचारासह त्यांचा विमा उतरविण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर, कार्याध्यक्ष अरुण पाटील, सचिव सुरेंद्र पांचाळ, गीता झगडे आदी पदाधिकारी तसेच क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीष महाजन, आमदार प्रताप सरनाईक, संजय शिरसाठ, डॉ. बालाजी किणीकर उपस्थित होते.

( हेही वाचा : १९७८ ला ज्यांनी गद्दारीची मुहूर्तमेढ उभारली त्यांनी आमच्यावर बोलू नये – गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल)

दहीहंडीला क्रीडा क्षेत्रामध्ये साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला असून समन्वय समितीचे पदाधिकारी आणि क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती दहीहंडीसाठी उभारण्यात येणारे मानवी मनोरे आणि इतर बाबींचा अभ्यास करणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.