देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. बेरोजगार तरुणांना उत्तम रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी देखील सरकारकडून प्रयत्न करण्यात येतात. अशातच आता बेरोजगार तरुणांना केंद्र सरकारकडून दरमहा 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमागची सत्यता आता केंद्र सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेक विंगच्या माध्यमातून समोर आली आहे.
अशी कुठलीही योजना सरकारकडून सुरू करण्यात आली नसून व्हायरल होत असलेला मेसेज खोटा असल्याचे पीआयबी फॅक्ट चेक विंगने म्हटले आहे.
(हेही वाचाः LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त 29 रुपये गुंतवा आणि 4 लाख कमवा)
पीआयबी फॅक्ट चेक विंगची माहिती
पंतप्रधान बेरोजगारी भत्ता योजनेंतर्गत केंद्र सरकार बेरोजगार तरुणांना दरमहा 6 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन रजिस्ट्रेशन करा, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मेसेज चुकीचा असून अशी कोणतीही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्याक आलेली नाही. त्यामुळे या मेसेजवर कोणीही विश्वास ठेऊ नये, तसेच असे मेसेज फॉरवर्ड करू नये, असे आवाहन पीआयबी फॅक्ट चेक विंगने ट्वीट करत केले आहे.
Join Our WhatsApp Communityएक वायरल #Whatsapp मैसेज में दावा किया जा रहा है कि प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना के तहत सरकार बेरोजगार युवाओं को हर महीने ₹6,000 का भत्ता दे रही है #PIBFactCheck
▶️ यह मैसेज फर्जी है
▶️ भारत सरकार ऐसी कोई योजना नहीं चला रही
▶️ कृपया ऐसे मैसेज फॉरवर्ड ना करें pic.twitter.com/c6XdfStC2z
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 20, 2022