Ganpati Festival Special train : कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! रेल्वे सोडणार ६ अतिरिक्त विशेष गाड्या

176

गणपतीला मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होतात. श्रीगणपती उत्सव २०२२ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मंगळुरु जंक्शन दरम्यान अतिरिक्त श्रीगणपती विशेष गाड्या (Ganpati Festival Special train) चालवणार आहे. मध्य रेल्वेने यापूर्वीच २१२ श्रीगणपती विशेष चालवण्याची घोषणा केली आहे. नव्या अतिरिक्त गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि संरचना खालीलप्रमाणे आहे…

( हेही वाचा : २५ ऑगस्टपूर्वी कोकणातून जाणाऱ्या रस्त्यांचे काम पूर्ण करा; रवींद्र चव्हाण यांची सूचना)

गणपती फेस्टिव्हल स्पेशल अतिरिक्त गाड्या

  • 01173 ही विशेष गाडी दिनांक २४ ऑगस्ट २०२२, ३१ ऑगस्ट २०२२ आणि ७ सप्टेंबर २०२२ (३ सेवा) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २०.५० वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी १७.०५ वाजता पोहोचेल.
  • 01174 ही विशेष गाडी दिनांक २५ ऑगस्ट २०२२, १ सप्टेंबर २०२२ आणि ८ सप्टेंबर २०२२ (३ सेवा) रोजी मंगळुरु जंक्शन येथून २०.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता पोहोचेल.

थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, कानकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, होन्नावर, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बैन्दूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरतकल, ठोकूर

संरचना : एक प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, दोन जनरेटर व्हॅन, एक पँट्री कार.

आरक्षण : विशेष गाडी क्र. 01173 चे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.