शिवसेनेची गळती अजूनही सुरुच आहे. आता माजी आमदार अशोक पाटील यांनी शिवसेनाविरोधात बंड पुकारले आहे. अशोक पाटील यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटाला समर्थन दिले आहे. हे समर्थन देताना, त्यांनी शिवसेना नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेत माझा अपमान सुरु होता. मला प्रत्येक कार्यक्रमातून डावलण्यात येत होते. मी शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात होत्या. पण यापूर्वीही मला उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर ठेवण्यात येत होते. मला उद्धव ठाकरेंपासून लांब ठेवले गेले. त्यामुळे मी नाइलाजाने शिंदे गटाला समर्थन देत आहे. मी घेतलेला निर्णय हा ठाम आहे, असे अशोक पाटील म्हणाले.
मागच्या अनेक वर्षांपासून मी शिवसेनेत काम करत होतो. त्यामुळे मी आमदार झालो. मात्र माझा अपमान करणे कार्यक्रमांना न बोलावणे आदी प्रकार सुरु होते. मला अपमानास्पद वागणूक मिळत होती. याबाबत मी अनेक वेळा पक्षश्रेष्ठींशी बोललो होतो. पण त्याची दखल घेतली गेली नाही, अशी खंतही अशोक पाटील यांनी व्यक्त केली.
( हेही वाचा: अमोल मिटकरी आणि नाडा नसलेली चड्डी )
कोळी बांधवही नाराज
कोळी बांधवांचे अनेक प्रश्न मी दिल्लीपर्यंत घेऊन गेलो. त्या कोळी बांधवांसाठीही शिवसेनेने काही केले नाही. आता कोळी बांधवदेखील नाराज आहेत. त्यामुळे कुठेतरी आता हिंदुत्वाची लाट सुरु झाली आहे. त्यामुळे आता कोळी बांधवांना न्याय मिळेल म्हणून मी एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी गेलो आणि मला न्याय मिळेल, असे वचन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे, पाटील यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community