नागपूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्पात रात्री उशिरा वनाधिकाऱ्यांना बफर क्षेत्रातील नवेगाव खैरी जलाशयात एक वाघ मृतावस्थेत आढळला. संरक्षण झोपडीत राहणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना जलाशयाच्या काठापासून सुमारे 500 मीटर अंतरावर वाघाचे शव तरंगताना दिसले.
सायंकाळी उशिरा संरक्षण झोपडीतील वनकर्मचाऱ्यांना पहिल्यांदा वाघाचा तरंगता मृतदेह आढळून आला. अखेर याबाबतची खात्री करून घेण्यासाठी जलाशयात वाघाच्या तरंगत्या मृतदेहाजवळ जाऊन वनाधिकाऱ्यांनी खातरजमा केली. पाण्याचा प्रवाह आणि रात्रीची वेळ असल्याने मृतदेह काढता आला नाही. मंगळवारी सकाळी वाघाचा मृतदेह बाहेर काढला जाईल, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.
( हेही वाचा: मुंबईच्या रस्त्यांवर आजही सुमारे ४००हून अधिक खड्डे )
Join Our WhatsApp Community