राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर; 24 तासांत दुस-यांदा बदलली तारीख

165

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च सुनावणी मागच्या 24 तासांत पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयात होणा-या सुनावणीबाबत अजूनही अनिश्चितता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये महाराष्ट्राच्या कामकाजाचा समावेश नाही. त्यामुळे सुनावणी 23 ऑगस्टला होण्याची शक्यता कमीच आहे. फार कमी वेळा सप्लिमेंट्री लिस्टमध्ये नसलेल्या गोष्टी कामकाजामध्ये समाविष्ट होतात.

23 ऑगस्ट म्हणजेच, मंगळवारी महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुनावणी होऊ शकते, असे सांगितले जात होते. पण मंगळवारी ही सुनावणी होण्याची शक्यता धुसरच. यापूर्वी हे प्रकरण 22 तारखेला सहाव्या क्रमांकावर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात होते. पण त्यावेळीही सुनावणी पुन्हा लांबणीवर गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे. तसेच, सध्याचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या कारकिर्दीत या प्रकरणाची सुनावणी होणार की हा सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक निर्णय  मोठ्या खंडपीठाकडे सोपवले जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

( हेही वाचा: वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे आजार वाढले )

निवडणूक आयोगातही महत्त्वाचा दिवस

मंगळवारी निवडणूक आयोगातही महत्त्वाचा दिवस आहे. कारण 23 ऑगस्टपर्यंत उद्धव ठाकरे गटाने आपले म्हणणे मांडावे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी आयोग काही निर्णय देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.