भारतीय संघाचे मुख्यप्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण

134

आशिया कप आधीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचे हेड कोच राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते आशिया कप स्पर्धेसाठी जाऊ शकतात की नाही याबद्दल संशय आहे. टीम इंडिया 23 ऑगस्ट म्हणजे आजच यूएईसाठी रवाना होणार आहेत. आशिया कप स्पर्धेची सुरुवात 27 ऑगस्टपासून होणार आहे. स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. भारतीय संघाचे मुख्यप्रशिक्षक राहुल द्रविडला कोरोनाची लागण झाल्याने, व्हीव्हीएस लक्ष्मणकडे संघाच्या मुख्यप्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

( हेही वाचा: शिवसेनेचे माजी आमदार अशोक पाटील शिंदे गटात सामिल; शिवसेनेत अपमान झाल्याचा केला आरोप )

आशिया कप 27 ऑगस्टपासून सुरु

आशिया चषकाला येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात खेळला जाणार आहे. तसेच, सुपर 4 साठी 6 सामने खेळवले जाणार आहेत. सुपर फोरचा पहिला सामना 3 सप्टेंबरला शाहजहामध्ये होणार आहे. तर या चषकाचा शेवटचा सामना 9 सप्टेंबरला म्हणजे फायनलच्या दोन दिवस आधी होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.