शासकीय परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालय सोलापूर, येथे गोरगरीब, मागासवर्गीय विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहोत. प्रशिक्षण काळात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनिषा शिंदे या स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात असे असताना, काही विद्यार्थ्यांनी अलिकडेच प्राचार्यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
( हेही वाचा : जागतिक वडापाव दिन : मुंबईची ओळख ते दुबईत २ हजाराला मिळणारा सोन्याचा वडापाव; ‘जगात भारी’ वडापावची गोष्ट)
केल्या गेलेल्या तक्रारी ह्या धादांत खोट्या आहेत. यात काही विद्यार्थ्यांची प्राचार्यांबद्दल कसलीही तक्रार नसल्याचे, त्यांनी लेखी स्वरूपात कळविले आहे. महाविद्यालयातील शिस्तपालनाबाबत प्रशिक्षणार्थींना व पालकांना महाविद्यालयात प्रवेश घेतानाच प्राचार्या व इतर पाठ्यनिर्देशकांकडून माहिती देण्यात येते. सद्यस्थितीत या तक्रांरीमुळे इतर विद्यार्थ्यांचेही विनाकारण शैक्षणिक नुकसान होत आहे. ही बाब प्रशासनाच्या लक्षात येत नाही हे दुर्दैवी आहे. प्राचार्या डॉ. मनिषा शिंदे या उच्चशिक्षित आहेत त्यामुळे त्या गोरगरीब/ मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे हीत जाणतात व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात, याची अनेक उदाहरणे आहेत. कोविड काळातही त्यांनी रुग्णालयीन जबाबदाऱ्या सांभाळून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही, या काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना जिल्हा व राज्यस्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्या महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटना मुख्यालय लातूर, या शासन मान्य संघटनेच्या राज्याध्यक्ष आहेत. त्यांनी संघटनेच्या माध्यमातून राज्यस्तरावर परिचारिकांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यासाठी अनेक आंदोलनातून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे अलिकडे संघटनेची व्याप्ती राज्यात झपाट्याने वाढत असून, संघटनेचा वाढता प्रभाव पाहता संवर्गातील काही विरोधी संघटना अशी कट कारस्थाने करण्याचा प्रयत्न करत असल्याची दाट शक्यता आहे असा दावा महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेने केला आहे.
…अन्यथा परिचारीकांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो
असाच प्रयत्न तीन वर्षांपूर्वी लातूर मध्येही झाला होता. तसेच मागील वर्षी गोकुळदास तेजपाल रुग्णालय मुंबई येथील, पाठ्यनिर्देशकांच्या खोट्या तक्रारी करुन प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या होत्या. परंतु त्या पाठ्यनिर्देशकांनी न्यायालयात दाद मागितली व त्यांना पुर्ववत पदस्थापना देण्यात आल्या. ससून रुग्णालय पुणे येथूनही अनेक तक्रारी अधिसेविका यांच्याबाबत होत्या. या सर्व बाबी लक्षात घेता अप्रत्यक्षपणे कोणीतरी सुडबुद्धीने त्यांच्या खोट्या तक्रारी करण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करत आहे असे आम्हाला वाटते. अधिष्ठाता यांनी लवकरात लवकर यावर पारदर्शक चौकशी करुन, खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी व शासनमान्य संघटनेच्या राज्याध्यक्षांना लवकरात लवकर न्याय द्यावा. त्यांची होणारी मानहानी थांबवावी, अन्यथा राज्यभर या, परिचारीकांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो असे महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community