‘बाळासाहेबांनी मला मिठी मारली आणि…’ राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली ‘त्या’ शेवटच्या भेटीची आठवण

150

दादरच्या रविंद्र नाट्यगृहात मंगळवारी मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करतानाच शिवसेना सोडून जाताना त्यांच्यात आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात झालेल्या अखेरच्या भेटीची पहिल्यांदाच माहिती दिली आहे.

त्या भेटीची आठवण

अलीकडे माझ्या मुलाखतीत मुलाखतकारांनी मला नारायण राणे,छगन भुजबळ,एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी बंड केल्याचं म्हटलं.पण मी बंड केलं नव्हतं. हे सगळेजण गेले ते एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले.पण राज ठाकरेने बाळासाहेबांना भेटून शिवसेना सोडली होती. ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंना मी पक्ष सोडणार असल्याचं कळलं तेव्हा आमच्यात शेवटची भेट झाली.

(हेही वाचाः ‘ही सत्तेची अ‍ॅडजस्टमेंट’, शिंदे-फडणवीस सरकारबाबत राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया)

बाळासाहेबांनी मिठी मारली आणि…

आजपर्यंत मी त्या भेटीबाबत कधीच सांगितं नाही. पण मी जेव्हा शिवसेना सोडत होतो तेव्हा मनहोर जोशी माझ्यासोबत होते. ते रुमच्या बाहेर गेल्यानंतर बाळासाहेबांनी मला बोलावलं. आलिंगनासाठी आपले दोन्ही हात माझ्यासमोर केले आणि मला घट्ट मिठी मारली. त्यानंतर बाळासाहेबांनी मला जायची परवानगी दिली, असे वर्णन करत राज ठाकरे यांनी त्या भेटीची आठवण सांगितली.

त्यामुळे मी दगाफटका किंवा गद्दारी करुन, पाठीत खंजीर खुपसून शिवसेनेतून बाहेर पडलो नाही. बाहेर गेल्यावर दुस-या कुठल्याही पक्षात गेलो नाही तर महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासावर नवीन पक्ष उभा केला, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.