गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी कोणत्याही प्रकारे अडचण येऊ नये, यासाठी पुणे पोलिसांकडून पोलिस ठाण्याअंतर्गत “एक खिडकी योजना’ सुरु करण्यात आली आहे. मंडळांचे अर्ज आल्यानंतर स्थानिक पोलिस ठाणे, वाहतुक शाखा व विशेष शाखेच्या पोलिसांकडून मंडळाच्या जागेची पाहणी करुन, कागदपत्रांची तपासणी करुन एक तासातच परवानी दिली जात आहे. आतापर्यंत पोलिसांकडे अकराशे अर्ज आले असून त्यापैकी एक हजार मंडळांना तत्काळ परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देऊ नका, अशा सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.
( हेही वाचा : आमच्याकडे सगळ्यांचा चिठ्ठा; मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा)
गणेशमंडळांना दिलासा
पोलिसांकडून प्रमुख गणेशोत्सव मंडळे, मानाच्या गणेशोत्सव मंडळांसह महत्वाच्या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या, शांतता कमिटी सदस्य व पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासाच्या सदस्यांच्या सातत्याने बैठका घेतल्या जात आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह परिमंडळ निहाय पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा व विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्यासमवेत सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. गणेश मंडळांची गैरसोय दूर करण्यासाटी पुणे महापालिकेने विविध प्राधिकरणांच्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी एक खिडकी योजना सुरू केल्यामुळे मंडळांना दिलासा मिळाला आहे.
Join Our WhatsApp Community