राज्य शासनाने तालुका क्रीडा संकुले उभारण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे, तसेच क्रीडा संकुलांची अनुदान मर्यादा वाढवण्यात आली आहे. राज्यात सद्यःस्थितीत एकूण १०० तालुका क्रीडा अधिकार्यांची पदे संमत करण्यात आली आहेत. यापैकी २० पदे भरली असून आणखी ४४ पदे येत्या १५ दिवसांत भरली जातील, अशी माहिती क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी २३ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्नोत्तरात दिली. सदस्य विक्रम काळे, सतीश चव्हाण, बाळाराम पाटील आदी सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
निवासी भत्ते आणि संकुलांची कामे करण्यासाठी ५ कोटी
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, क्रीडा अधिकार्यांना निवासी भत्ते आणि संकुलांची कामे करण्यासाठी ५ कोटी रुपयांपर्यंत, जिल्हा क्रीडा संकुलांसाठी २५ कोटी रुपये आणि विभागीय क्रीडा संकुलासाठी ५० कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. निधी वाढवण्यात आल्या असल्याने चांगले खेळाडू सिद्ध होतील, अशी अपेक्षा आहे. क्रीडा संकुलासाठी जागेची अडचण येत असेल, तर याविषयी बैठक घेऊन अडचणी सोडवण्यात येतील, तसेच जिल्हाधिकार्यांशी याविषयी बोलून प्रश्न सोडवण्यात येईल.
Join Our WhatsApp Community