प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करण्याचा उद्योग, सावरकर प्रेमींची टीका

153

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसच्या शिदोरी या मुखपत्रातून निंदनीय आरोप करण्यात आले होते. पण कुठल्याही तथ्यांचा अभ्यास न करता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अर्थहीन आणि बिनबुडाचे आरोप करण्यात येतात. अशीच एक बिनबुडाची टीका मोना आंबेगावकर या महिलेने केला आहे. एक आक्षेपार्ह ट्वीट करत मोना यांनी गंभीर आरोप केला आहे. पण यावरुनच सावरकर प्रेमींनी मोना यांचा समाचार घेतला आहे.

प्रसिद्धीसाठी काही लोकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करण्याचा उद्योग आरंभला असून यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शुद्ध चारित्र्यावर कोणताही डाग लागणार नाही, असं मत स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक आणि इतिहासकार चंद्रशेखर साने यांनी मांडले आहे.

प्रसिद्धीसाठी सावरकरांची बदनामी

सावरकर हे प्रखर हिंदुत्वाचा चेहरा असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सावरकरांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे सावरकरांवर अत्यंत हीन दर्जाचे आरोप केले जातात, त्या आरोपांना कुठलाही ठोस असा पुरावा नसतो. पण तरीही रेटून खोटे बोलायची सवय काही लोकांना लागलेली आहे. अशा लोकांना त्यांच्या बोलवित्या धन्यांकडून सांगितलं जातं त्याप्रमाणे हे लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाऊन टीका करतात.

सरकारने धडा शिकवण्याची गरज

आता या महिलेचे नाव मला माहीत नाही किंवा त्यांना उत्तर देण्याची देखील मला आवश्यकता वाटत नाही. पण सावरकरांसारख्या व्यक्तिमत्वावर होणारी ही चिखलफेक थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. त्यामुळे अशा समाज कंटकांना धडा शिकवणं हे सरकारचं कर्तव्य आहे, असं चंद्रशेखर साने यांनी म्हटले आहे.

सावरकरांचे चारित्र्य निष्कलंक

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे दैवत आणि प्रेम हे केवळ आणि केवळ आपली भारतमाता होती, असं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्रातही म्हटले आहे. सावरकर लंडनमध्ये असताना त्यांच्या हालचालींबाबत माहिती घेण्यासाठी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ध्यानचंद वर्मा या साथीदार क्रांतिकारकांची नियुक्ती केली होती, त्यांनी सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चारित्र्य हे निष्कलंक असल्याचे सांगत क्रांतिकार्य हे सावरकर पुढे नेऊ शकतील, असा विश्वास प्रकटला केला. म्हणूनच श्यामजी कृष्ण वर्मांनी सावरकरांवर लंडनमधील इंडिया हाऊसची जबाबदारी सोपवली होती, असे साने यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा आणि तैलचित्र महाराष्ट्र विधानसभेत लावले जावे, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठंची मागणी)

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वास्तव्य केलेली जगभरातील महत्वाची जी ठिकाणे आहेत त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करुन त्यांना स्मारकाचं रुप देणं गरजेचं आहे. त्यासाठी सावरकर प्रेमींनी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी पुढे यायला हवं, असं आवाहनही चंद्रशेखर साने यांनी केलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.