दक्षिण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याकरिता बेस्ट उपक्रमाद्वारे दुमजली बसद्वारे हेरिटेज टूर बससेवा चालवली जाणार आहे. ३१ ऑगस्ट २०२२ ते ८ सप्टेंबर २०२२ या गणेशोत्सव कालावधीदरम्यान दक्षिण मुंबईतील विविध गणपती मंडळांना विशेषत: फोर्ट, गिरगाव, खेतवाडी, लालबाग, भायखळा इत्यादी ठिकाणी रात्रीच्या वेळेस भेट देण्याकरिता ही हेरिटेज टूर बससेवा चालविण्याचे ठरविले आहे.
( हेही वाचा : गणेशोत्सवात रात्री विशेष ‘बेस्ट’ बससेवा; प्रवाशांसाठी २५ गाड्यांचे नियोजन )
बसमार्ग व तिकीट दर
सदर हेरिटेज दुमजली बसगाडया रात्री १०.०० ते सकाळी ६.०० या वेळेत १ तासाच्या प्रस्थांतराने चालविल्या जातील. या बससेवेची सुरुवात म्युझियम येथून सुरु होऊन गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह, गेट, महर्षि कर्वे रोड, गिरगाव चर्च प्रार्थना समाज, ताडदेव. मुंबई सेंट्रल, भायखळा, जिजामाता उद्यान, लालबाग आणि परत भायखळा, मुंबई सेंट्रल, ताडदेव बनौरोड, मरिन लाइन्स, मेट्रो सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पुन्हा म्युझियमपर्यंत ही बससेवा हॉप ऑन हॉप ऑफ या पध्दतीने कार्यान्वित असेल. त्या बससेवेसाठी वरच्या व खालच्या मजल्यासाठी अनुक्रमे रु.१५०/- आणि रु. ७५/- असे तिकीट दर असतील.
अधिक माहितीसाठी संपर्क
अधिक माहितीसाठी प्रवाशांनी कृपया बेस्टच्या हेल्पलाईन क्रमांक १८२२७५५० (टोल फ्री क्रमांक) आणि ०२२ – २४१९०११७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. प्रवाशांना विनंती करण्यात येते की, या गणेशोत्सवादरम्यान विविध गणपती मंडळांना भेटी देण्यासाठी सदर हेरिटेज टूर बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.
Join Our WhatsApp Community