उद्धव ठाकरे म्हणतात, माघार घेणार नाही, महाविकास आघाडी तुटली नाही

143
कोरोना सारख्या मोठ्या संकटात माघार घेतली नाही, त्यापुढे हे संकट काहीच नसल्याचे सांगत त्यामुळे यावेळी माघार घेणार नाही आणि महाविकास आघाडीही तुटणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिंदे-फडणवीस सरकार राज्यात येताच शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसची महाविकास आघाडी तुटली अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र मंगळवारी, २३ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली, त्यावेळी स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहिले होते, त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले.

देशात लोकशाही राहणार की बेबंदशाही रहाणार 

अजित पवार यांनी गेल्या अडीच वर्षात आर्थिक गाडा सांभाळला. कोविड काळातही आर्थिक गाडा व्यवस्थित हाताळला आहे. त्यामुळे अजित पवार यांचे आभार मानतो. माझ्या लोकांवर मी विश्वास टाकला, त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला. केंद्र आणि राज्य सरकारची तुलना करायची झाली तर ती इंग्रजांशीच करावी लागेल. इंग्रजांप्रमाणे अत्याचारी सरकार असल्याचा गंभीर आरोप ठाकरेंनी केला. हा जो निकाल लागणार आहे तो या देशात लोकशाही राहणार की बेबंदशाही रहाणार याचा हा निकाल आहे. यावेळी सत्ता गेली तरी आपण एकत्र आहेत यांचे कौतुक असल्याचेही ते म्हणाले.

ठाकरे यांच्याकडून अजित पवारांचे कौतुक

जगभरात संकट होते तेव्हा आपल्याला सत्ता मिळाली आणि आता कोरोना गेल्यावर यांनी सत्ता हिस्कावली. पण आपल्याला संघर्ष करायचा आहे. संघर्षाला आपण मागे हटणार नाही. मी फार काळ अधिवेशनात उपस्थित राहत नाही. कारण इथलं गांभीर्य राहिलेलं नाही. सदनाची परंपरा रसातळाला गेली आहे. मागच्या अडीच वर्षात अजित पवार यांनी आर्थिक गाडा ज्या पद्धतीने सांभाळला त्याचं कौतुक आहे. जर कोरोना काळात जीव वाचवणयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तरी आम्ही कामे केली नाही, असे जर म्हणत असेल तर त्याला अर्थ नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. १५ आमदारांनाही अनेक ऑफर आल्या. पण, ते माझ्या सोबत राहिले याचा मला अभिमान आहे. मरण पत्करू पण शरण जाणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. अनेक वर्षे राजकारण केले, पाहिले. पण वैयक्तिक संबंध कधी बिगडू दिले नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.