बेस्टची दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष मोहीम

182

डिजिटल तिकीट पद्धतीला जास्तीत जास्त चालना देण्याच्या हेतूने बेस्ट उपक्रमाने बेस्ट चलो अ‍ॅप आणि स्मार्ट कार्ड बसपास, एनसीएमसी कार्ड अशा अनेक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या. तसेच पदवीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता बेस्ट बसपासमध्ये सवलत दिली जाते. यानंतर आता बेस्ट उपक्रमाने दिव्यांग व्यक्तींसाठी जुने सवलतीचे ओळखपत्र बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : एसटी महामंडळाकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी; ११० कर्मचाऱ्यांचा थकीत रक्कम मिळण्याआधीच मृत्यू )

विशेष श्रेणीतील व्यक्तींना स्मार्टकार्ड देण्यासाठी विशेष मोहीम

विशेष श्रेणीतील व्यक्तींनी सवलतींसाठी बेस्ट चलो अ‍ॅप डाऊनलोड करून बसपासच्या मान्यतेकरता ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाहीत अशा विशेष व्यक्तीपर्यंत स्मार्ट कार्ड पोहोचवण्यासाठी बेस्टने विशेष मोहीम हाती घेतली आहे. बेस्ट कॉल सेंटरकडून विशेष सवलतीच्या पात्र पासधारकांना कॉल केला जाईल व जे स्मार्टकार्ड घेण्यास इच्छुक आहेत त्यांना त्यांच्या पत्त्यावर कुरिअरद्वारे कार्ड पोहोचवले जाईल. बेस्टचे कॉल सेंटर २४ तास सुरू राहणार असून त्यांचा क्रमांक १८००-२२७-५५० आणि ०२२-२४१९०११७ असा आहे.

१५ सप्टेंबरपासून जुने बसपास अवैध

सर्व विशेष श्रेणीतील प्रवाशांना त्वरित बेस्ट चलो अ‍ॅपद्वारे त्यांचे जुने कार्ड बदली करून घ्यावे किंवा नवे स्मार्ट कार्ड घ्यावे असे बेस्ट उपक्रमाने सांगितले आहे. तसेच १५ सप्टेंबर २०२२ पासून जुने बसपास अवैध मानले जातील असेही उपक्रमाने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.