CNGच्या दरवाढीमुळे काळ्या- पिवळ्या टॅक्सी चालकांना आर्थिक फटका बसत असून, सातत्याने भाडेवाढीची मागणी करुनही राज्य शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. याबाबतचे पत्र संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो 6 रुपये कपात केली. ही कपात कमीच असून, टॅक्सी चालकांना आर्थिक फटका बसत आहे. 1 मार्च 2021 झालेल्या भाडे सुधारणेनंतर आतापर्यंत CNGच्या दरात एकूण 32 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे टॅक्सी- रिक्षा चालकांना प्रत्येक दिवशी 250 ते 300 रुपये अधिक मोजावे लागतात, असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए.एल.क्वाड्रोस यांनी सांगितले.
( हेही वाचा: ‘मिटकरी म्हणजे राजकारणाला लागलेला काळा डाग’, शिंदे गटाची टीका )
…तर बेमुदत संपावर जाणार
सध्या टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपये असून, त्यात दहा रुपयांची वाढ मिळावी, अशी मागणी टॅक्सी चालकांकडून केली जात आहे. ही दरवाढ न मिळाल्यास, 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community