मुंबई शहरातील जुहू आणि दहीसर येथे असलेल्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या रडार यंत्रणा गोराई परिसरात हलवण्याबाबत विचार सुरू असून, याबाबत संबंधित सर्व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये आमदार मनिषा चौधरी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते. फडणवीस यांनी सांगितले की, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या रडार यंत्रणेमुळे काही विशिष्ट उंचीच्या वर कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये असे निर्बंध आहेत. मात्र या रडार यंत्रणा गोराई येथे हलवण्याबाबत केंद्र सरकारच्या विभागाशी संपर्क साधला जात आहे. त्याचबरोबर याबाबत मुंबई महानगरपालिका, महसूल विभाग आणि भारतीय विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. याबाबत येत्या दोन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल.
( हेही वाचा: … तर 15 सप्टेंबरपासून मुंबईत टॅक्सी धावणार नाही )
लातूर विमानतळाबाबत लवकरच बैठक
लातूर विमानतळाच्या विकासाबाबत लवकरच सर्व संबंधितांची बैठक घेतली जाईल आणि तोडगा काढला जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community