कोकणात २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

138

गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात जातात. यावेळी होणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन मुंबई-गोवा हायवेवरील अवजड वाहतूक ही बंद ठेवण्यात ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा मोठा सण आहे त्यामुळे मुंबई-पुण्यातून चाकरमानी मोठ्या प्रमाणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात त्यांच्या मूळ गावी येतात यामुळे दरवर्षी मुंबई-गोवा हायवेवर वाहनांची कोंडी होते.

( हेही वाचा : एसटी महामंडळाकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी; ११० कर्मचाऱ्यांचा थकीत रक्कम मिळण्याआधीच मृत्यू )

यामुळेच २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. गणेशभक्तांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी महामार्ग पोलीस सुद्धा सज्ज असणार आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर या वाहनांना बंदी

गणेशोत्सवाला होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाने सुद्धा विशेष गाड्या सोडल्या आहेत. २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर ज्या वाहनांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनपेक्षा जास्त आहे अशी अवजड वाहने, ट्रक, मल्टी एक्सल, ट्रेलर इत्याही वाहनांना बंदी असते.

या वाहनांना मुभा

दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला आणि नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.