राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती

142
राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अवैध धंद्याबाबत चौकशी करणार

नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. तसेच एका अधिकाऱ्यास एकाच पदावर अथवा शहरात जास्त काळ नियुक्ती दिली जाऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याबाबत सदस्या मंदा म्हात्रे यांनी चर्चा उपस्थित केली होती.

‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी

  • अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील घटनेतील पोलीस अधिकारी संजय सानप यांची विभागीय चौकशी केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
  • आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते. फडणवीस यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी संजय सानप यांना निलंबित करण्यात आले आहे.
  • त्यांचे या घटनेतील इम्रान कुरेशी यांच्याशी काही संबंध आहेत का? याची चौकशी केली जाईल. यामध्ये तथ्य आढळल्यास विशेष कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.