भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा खून, सोनालींच्या भावाचा आरोप

113

भाजप नेत्या आणि सोशल मीडिया स्टार असलेल्या सोनाली फोगाट यांचे 23 ऑगस्ट रोजी गोव्यात निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण यामागे मोठं षडयंत्र असून सोनाली फोगाट यांचा खून करण्यात आल्याचा आरोप त्यांचे भाऊ रिंकू ढाका यांनी केला आहे. फोगाट यांचा स्वीय सहायक सुधीर सांगवान यानेच त्यांची हत्या केल्याचे रिंकू यांनी म्हटले आहे. याप्रकरणी रिंकू यांनी गोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सोनाली यांच्या भावाचा आरोप

सोनाली यांचा पीए सुधीर सांगवान हा गेल्या काही महिन्यांपासून सोनाली यांना ब्लॅकमेल करत होता. सोनाली यांच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल करुन त्यांची कारकीर्द संपवण्याची धमकी देखील तो देत होता. त्यामुळे सुधीरनेच सोनाली फोगाट यांना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचा आरोप रिंकू ढाका यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात गोवा पोलिस देखील ढिलाई दाखवत असल्याचे रिंकू यांनी म्हटले आहे.

काय आहेत आरोप?

भाजपकडून सोनाली फोगाट यांनी 2019 मध्ये आदमपूर विधानसभा निवडणूक लढवली होती. याचवेळी त्यांची सुधीर सांगवानशी ओळख झाली होती त्यानंतर तो सोनाली यांचा पीए म्हणून काम करू लागला होता. सुधीरच्या सांगण्यावरुनच सोनाली आपले सर्व व्यवहार करत होती. सुधीरने सोनालीच्या घरातील नोकर आणि आचा-यालाही कामावरुन काढून टाकले होते. 22 ऑगस्ट रोजी सोनालीने गोव्याहून आपल्या आईला फोन केला होता. त्यावेळी सुधीरने आपल्याला खाण्यातून काहीतरी दिल्यामुळे त्रास होत असल्याचे सोनालीने सांगितले होते. त्यानंतर दुस-या दिवशी सकाळी तिचा मृत्यू झाल्याचे आम्हाला कळले.

सोनाली शूटिंगसाठी गोव्याला गेल्याचे सांगण्यात येत होते. पण गोव्यात तिचं कोणतंही शूट सुरू नसून सुधीर सांगवान आणि त्याचा साथीदार सुखविंदर यांनी जबरदस्तीने तिला गोव्यात नेऊन तिचा खून केल्याचा आरोप रिंकू ढाका यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.