मुंबईतील काही शाळा पालकांना त्यांच्या पाल्यांना अमूक एका स्कूल बसमधून मुलाला पाठवा अशी सक्ती करतात, अशा शाळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत केली.
( हेही वाचा : ‘कोरोना पास’ शिक्का पुसणार; विद्यार्थ्यांसाठी ‘ब्रिज कोर्स’ उपक्रम )
१ हजार ६१ स्कूल बसवर कारवाई
राज्यात शालेय बस आणि वाहने मधून होणारी विद्यार्थ्यांची वाहतूक असुरक्षित असल्याचे ऑगस्ट २०२२ च्या पहिल्या आठवड्यात आणि त्या सुमारास आले, त्याविषयी ठरवून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केले जात आहे, असे दिसून आले आहे, अशी लक्षवेधी आमदार नागो गाणार यांनी विधान परिषदेत मांडली. त्यावेळी बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, राज्यात ४७ हजार ७४३ नोंदणीकृत स्कूल बस आहेत. त्यातील १ हजार ६१ स्कूल बसवर नियमांचे उल्लंघन केले म्हणून कारवाई केली आहे, त्यांच्याकडून ५५ कोटी दंड वसूल केले आहेत, असेही मंत्री देसाई म्हणाले.
किमान वेतन देणे सक्तीचे
स्कूल बसवरील चालकांना किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. त्यावर बोलताना मंत्री देसाई यांनी स्कूल बसच्या कामगारांना किमान वेतन देण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी होण्यासाठी गुरुवारी कामगार आयुक्त यांच्यासोबत थेट स्कूल वाहन चालक यांच्यासोबत बोलून त्यांना किमान वेतन मिळते का, हे तपासले जाईल जे चुकीचे आढळून येतील त्यांच्यावर कारवाई करू, असेही मंत्री देसाई म्हणाले.
Join Our WhatsApp Community