मुंबईत पावसाच्या पाण्याचा अंदाज घेण्यासाठी ठिकठिकाणी पर्जन्य जल मापके बसवण्यात आली असली तरी अनेक ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत त्याठिकाणी पडणाऱ्या पावसाचे मोजमाप करण्यासाठी तसेच तुंबणाऱ्या पाण्याची पातळी मोजण्यासाठी आता रिमोट रिडींग क्षमतेच्या भौतिक उपकरणे बसवली जाणार आहेत. ज्याद्वारे तेथील पावसाची आणि साचलेल्या पाण्याची माहिती दर १५ मिनिटांनी मोबाईल तसेच संगणकावर उपलब्ध होणार आहे.
( हेही वाचा : २०० लीटर रक्त वाया गेल्याप्रकरणी राजावाडी रुग्णालयाला नोटीस)
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सध्या काही ठराविक ठिकाणी पावसाची नोंद घेण्यासाठी पर्जन्य जलमापके बसवण्यात आले आहे. परंतु मुंबईतील आजही १८१ पाणी तुंबण्याची ठिकाणे आहेत. त्यामुळे सध्या पावसाळ्यात पूरस्थिती मोजण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. जे सर्व पूरग्रस्त ठिकाणांच्या पावसाळ्याच्या पूर पातळीची प्रत्यक्ष माहिती देवू शकत नाही. त्यामुळे महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या माध्यमातून मुंबई शहर व उपनगरांमधील विविध १२१ पाणलोट क्षेत्रांमध्ये पावसाळ्यात रिमोट रीडिंग, पर्जन्यमान मोजणीसह ऑटो ऍक्टीव्हेटेड रेन वॉटर लॉगिंग लेव्हल डिटेक्शन आणि रिपोटींग उपकरणाचा वापर कयन पावसाच्या पाण्याचा पातळी शोधणे आणि त्यामुळे पूर परिस्थितीचा अहवाल बनवण्याकरता या प्रणालीची अवलंब करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये या प्रणालीची रचना करणे आणि याचा पुरवठा केल्यानंतर पुढील तीन वर्षांची देखभाल करणे आदींसाठी कंत्राटदारांची निवड करण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती.
( हेही वाचा : देवनार ऊर्जा प्रकल्पाच्या सल्लागार सेवेवरच ४३ कोटींचा खर्च)
या प्रणालीद्वारे रस्त्यांवर साचलेल्या पाण्याच्या पातळीची माहिती इंचामध्ये आणि पाण्याच्या पातळीमधील वाढत्या किंवा कमी होत असलेल्या प्रमाणाची अचूक माहिती मि.मी किंवा तासाच्या एककामध्ये मोबाईल फोनवर तसेच वैयक्तीक संगणकावर १५ मिनिटांच्या अंतराने मिळेल. यामध्ये फक्त पाणी साचण्याच्या परिस्थितीत डॅशबोर्डवर स्थानाचे नाव, वेळ, तारीख स्टँप आणि बॅटरी पातळी यांचीही माहिती मिळेल. ज्याद्वारे ठराविक भागांमध्ये तुंबणाऱ्या भागातील पावसाच्या पाण्याची पातळी व पुराची पाण्याची पातळी मोजणे शक्य होईल,असे पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये अर्थ हेल्थ टेक इंडिया ही कंपनीला पात्र ठरली असून या कंपनीला यंत्रणा बसवण्यासाठी १.३३ कोटी रुपये आणि पुढील तीन वर्षांची देखभाल आदींकरता ९८.३४ लाख अशाप्रकारे एकूण २.३२ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी पुढील दोन महिन्यांमध्ये १०० उपकरणे बसवली जाणार आहे.
सन २०१७ च्या पावसाळ्यात २२५ ठिकाणी पाणी साचत असल्याचे आढळून आले होते. या सर्व ठिकाणी पाणी साचण्यामागील कारणांच्या मुळाशी जाऊन सखोल अभियांत्रिकीय अभ्यास करण्यात आला. त्यातील आजतागायत ११२ ठिकाणी पाणी साचत असून येत्या पावसाळ्यातील यातील ८० ठिकाणे कमी होणार आहे. त्यामुळे एकाबाजुला पावसाच्या पाण्यामुळे तुंबणाऱ्या ठिकाणांची संख्या कमी केली जात असताना याठिकाणी पर्जन्य मापके बसवणे आणि त्याठिकाणी तुंबणाऱ्या पाण्याचे मोजमाप करण्यावर सव्वा दोन कोटींचा खर्च केला जात असल्याने भविष्यात तुंबणाऱ्या पाण्याची ठिकाणे कमी होण्याची शाश्वती खुद्द प्रशासनाला वाटत नसल्याचे दिसून येते.
Join Our WhatsApp Community