पालिकेच्या देवनार येथील कत्तल खान्यावर पेटा या प्राणीप्रेमी संस्थेने आक्षेप नोंदवला आहे. पेटाने जून आणि जुलै महिन्यात देवनार कत्तलखान्याला भेट दिली होती. प्राण्यांना हाताळण्याच्या पद्धती, स्वच्छता तसेच कत्तल करण्याची पद्धत क्रूरतेने दिसून येत असल्याचे निरीक्षण पेटाच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे. ही क्रूरता प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप पेटाने केला आहे.
पेटाचे देवनार कत्तल खान्यातील निरीक्षण –
- म्हशींना एकमेकांसमोर मारले जाते
- म्हशींना बेशुद्ध न करता मारले जाते
- म्हशीची कातडी सोलून काढण्यापूर्वी कामगार म्हस मेल्याची खात्री करत नाहीत
- कामगार जनावरांचे अवयव उघड्या हातांनी हाताळतात, अनवाणी पायाने चालतात
- म्हशी, बकऱ्या आणि मेंढ्याच्या कातड्यांचे ढीग कित्येक तास रस्त्यावर, फरशीवर सोडले जातात
- जनावरांच्या बाजारात शेळ्या, मेंढ्या आणि म्हशीचे मृतदेह बराच काळ पडून राहिलेले असतात
- ट्रकमधून जनावरे बाहेर काढताना योग्य ती खबरदारी घेतली जात नाही. परिणामी, प्राणी गंभीररित्या जखमी होतात.
( हेही वाचा: Central Railway: मध्य रेल्वेची ‘या’ स्थानकांदरम्यान वाहतूक विस्कळीत )
पेटाचे आवाहन
अन्न किंवा प्राण्यांच्या शरीरावरील चामड्यासाठी त्यांना मारले जाते. जनावरांचे मांस खाल्ले किंवा चामडे वापरले तर आपण क्रूरतेला पाठींबा देत आहोत. जनतेने शाकाहारी होणे गरजेचचे आहे. -डॉ किरण आहुजा, शाकाहारी उत्पादक व्यवस्थापक
Join Our WhatsApp Community