मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणा-यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. परशुराम घाटात आता रात्रीच्यावेळी कोणत्याही वाहनांवर निर्बंध नसणार आहेत. आता सर्व वाहनांसाठी मुंबई गोवा महामार्गावरील महत्त्वाचा घाट रस्त्यांपैकी एक असलेला परशुराम घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मागच्या दोन महिन्यांपासून या घाटातील वाहतुकीवर निर्बंध होते. रात्रीच्या वेळी या महामार्गावरुन अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
जुलै महिन्यात रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. त्याचा फटका परशुराम घाटालाही बसला होता. परशुराम डोंगराला भेगा गेल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. अखरे 5 जुलैपासून हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर काही मर्यादित वेळेत 14 जुलैपासून घाटातील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. पण अवजड वाहनांच्या एकेरी मार्गिकेसाठी हा घाट सायंकाळी 7 नंतर इतर वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा सर्वच वाहनांसाठी हा घाट खुला करण्यात आला आहे. तसे आदेशही स्थानिक जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
( हेही वाचा: केंद्राचा अहवाल सांगतो ‘ती’ च बाॅस )
Join Our WhatsApp Community