सप्टेंबर महिन्यात 13 दिवस बॅंका राहणार बंद; पहा सुट्ट्यांची यादी

134

Bank holidays in September 2022: ऑगस्ट महिना संपून लवकरच सप्टेंबर महिना सुरु होणार आहे. अशा वेळी तुमची बॅंकेत काही महत्त्वाची कामे असतील तर ती आताच उरकून घ्या. कारण सप्टेंबर महिन्यात 13 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, सप्टेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत, याची यादी जाहीर केली आहे.

Reserve bank of India ने दिलेल्या यादीनुसार, 13 दिवस बॅंकांना सुट्टी असणार आहे. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात.

( हेही वाचा: अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाची छापेमारी; चार कारखान्यांची तपासणी सुरु )

सुट्ट्यांची संपूर्ण यादी ( Bank Holidays list in September 2022)

  • 1 सप्टेंबर- गणेश चतु्र्थी (दुसरा दिवस) पणजीत बॅंका बंद
  • 4 सप्टेंबर- रविवार ( साप्ताहिक सुट्टी)
  • 6 सप्टेंबर- कर्मपूजा ( रांचीमध्ये बॅंका बंद)
  • 7 सप्टेंबर- पहिला ओणम ( कोची आणि तिरुअनंतपुरमध्ये बॅंका बंद)
  • 8 सप्टेंबर- थिरुओनम (कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बॅंका बंद)
  • 9 सप्टेंबर- इंद्रजत्रा (गंगटोकमध्ये बॅंक बंद)
  • 10 सप्टेंबर- दुसरा शनिवारी, श्री नरवण गुरु जयंती
  • 11 सप्टेंबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • 18 सप्टेंबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • 21 सप्टेंबर- श्री नरवणे गुरु समाधी दिन ( कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बॅंका बंद)
  • 24 सप्टेंबर- चौथा शनिवार
  • 25 सप्टेंबर- रविवार ( साप्ताहिक सुट्टी)
  • 26 सप्टेंबर- नवरात्री स्थापना ( इन्फाळ) (मणिपूर) आणि जयपूरमध्ये बॅंका बंद)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.