मुंबईत दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी १० हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय विसर्जन सोहळ्याच्या दिवशी मुंबईत ७४ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई शहरात वाहतूक सुरळीत रहावी आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे.
( हेही वाचा : आता २०० ‘बेस्ट’ बसमध्ये प्रवाशांना मिळणार ‘टॅप इन टॅप आउट’ सुविधा )
गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड टी जंक्शन, गणेश घाट व पवई या महत्त्वाच्या विसर्जनस्थळी मुंबई शहर वाहतूक पोलिसांचा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी महत्त्वाच्या ठिकाणी निरीक्षण मनोरे उभारण्यात येणार आहेत.
विसर्जनासाठी मार्गांमध्ये बदल
मुंबईत दीड दिवस, पाच दिवस( ४ सप्टेंबर), गौरी-गणपती(५ सप्टेंबर), सातवा दिवस ( ६ सप्टेंबर) तसेच अनंत चतुर्दशीला मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन मिरवणुका निघतात. त्यामुळे या दिवसात मुंबईत वाहतूक मार्गात बदल करण्यात येईल. विसर्जन मिरवणुकांमुळे ७४ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच ५४ रस्ते एक दिशा मार्ग करण्यात येणार आहेत. मुंबईतील ५७ रस्तेमार्गावर मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. याशिवाय ११४ ठिकाणी वाहने उभी करण्यास बंद घालण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community