दिवसागणिक ऑनलाइन गेम खेळणा-यांची संख्या वाढत आहे. मोठे असो व लहान अगदी सर्वांनाच मोबाइल गेमची आवड असते. वेगवेगळ्या प्रकारच्या मोबाइल गेमविषयी अनेकदा बोलले जाते. तसाच एक गेम आता भारत सरकारच्या सहाकार्याने बनवण्यात आला आहे. याविषयी जाणून घेऊया. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या खेळाची ओळख झाली आहे. स्वातंत्र्याच्या वीरांची आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी या खेळाच्या अगदी सुरुवातीला दाखवली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत हा मोबाइल गेम सादर करण्यात आला आहे. हे अॅप अॅंड्राॅइड आणि आयओएससाठी रिलीज करण्यात आले आहेत. हे अॅप हिंदी आणि इंग्रजी दोन्ही सपोर्ट करते. हे सप्टेंबर 2022 पासून जागतिक स्तरावर उपलब्ध होईल.
दोन्ही मोबाइल गेम्सना आझादी क्वेस्ट आणि हिरोज ऑफ भारत मोबाइल गेम असे नाव देण्यात आले आहे आणि झिंगा इंडियाने प्रकाशन विभाग आणि इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च यांच्या सहकार्याने विकसित केले आहे. मोबाइल अॅप लाॅंच करताना, मंत्री ठाकूर म्हणाले की, हा गेम ऑनलाइन गेमच्या मोठ्या बाजारपेठेचा वापर करण्याच्या आणि या गेमच्या मदतीने त्यांना शिक्षित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. भारत सरकारच्या विविध युनिट्स देशाच्या प्रत्येक भागातून निनावी स्वातंत्र्यसैनिकांची माहिती गोळा करत आहेत.
( हेही वाचा: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास लवकर मंजूरी द्या; एकनाथ शिंदे यांची पंतप्रधानांना विनंती )
भारतीय स्वातंत्र्याशी संबंधित ज्ञानाची चाचणी घेणारं क्विज
2021 मध्ये ऑनलाइन गेमिंग क्षेत्र 28 टक्के वाढले आहे आणि 2023 मध्ये ऑनलाइन गेमर्सची संख्या 450 दशलक्षापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले की, या ऑनलाइन गेम विकसित करण्याची कल्पना ठाकूर आणि झिंगा इंडियाचे प्रतिनिधी यांच्यात यावर्षी दुबई एक्स्पोच्यावेळी झालेल्या बैठकीदरम्यान आली. आझादी क्वेस्ट मालिकेतील पहिले दोन गेम हे भारताच्या स्वातंत्र्याची कहाणी सांगतात आणि महत्त्वाचे टप्पे आणि नायकांची माहिती मजेशीर पद्धतीने देतात. हिरोज ऑफ इंडिया हे भारतीय स्वातंत्र्याशी संबंधित ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी क्विझ गेम म्हणून डिझाइन केले आहे. स्वातंत्र्याच्या वीरांची आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी या खेळाच्या अगदी सुरुवातीला दाखवली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत हा मोबाइल गेम सादर करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community