महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गणेशोत्सवानिमित्त शाळा,महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. येत्या 31 ऑगस्टपासून सुरू होणा-या गणेशोत्सवासाठी मुंबई विभागातील शाळा व महाविद्यालयांना 5 दिवसांची सुट्टी जाहीर करावी अशी मागणी मनसेकडून शिक्षण विभागाला करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून ही मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांच्याकडून निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांना पत्र लिहीत ही मागणी केली आहे.
(हेही वाचाः राज ठाकरे यांना पोलिसांची नोटीस, ‘त्या’ सभेप्रकरणी आरोपपत्र दाखल)
शिक्षण विभागाकडे मागणी
31 ऑगस्ट पासून राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक शाळा, महाविद्यालयांना मोजक्याच दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे शाळा,महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना पाच दिवसांची सुट्टी देण्याची मागणी मनविसेकडून शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. तसेच या काळात कोणत्याही परीक्षा अथवा प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात येऊ नये, असेही मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे ही मागणी मान्य झाल्यास शाळा,महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community