भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यांबाबतचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येतात. पण त्यामुळे अनेकदा गडकरी यांना अडचणींचा सामना करावा लागतो. अलिकडेच असा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याबाबत स्वतः नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्वीट करत गडकरी यांनी या दोन्ही व्हिडिओबाबत खुलासा केला आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाची आणि केंद्रीय निवडणूक समितीची नुकतीच पुनर्चना करण्यात आली. यामध्ये नितीन गडकरी यांना स्थान देण्यात आलं नाही. त्यानंतर त्यांच्याबाबतीतला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. ज्यामध्ये मंत्रीपद गेलं तरी मला फरक पडत नसल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नितीन गडकरी हे नाराज असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. त्यावरुन नितीन गडकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्या भाषणाची मोडतोड करुन हा व्हिडिओ व्हायरल करण्यात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कुछ मीडिया संस्थानों और व्यक्तियों द्वारा चलाये जा रहे झूठे अभियान की सच्चाई। pic.twitter.com/O7v3MikOYP
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) August 25, 2022
वक्तव्याचा विपर्यास
दिल्लीतील पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी झालेल्या एका कार्यक्रमात गडकरी यांनी 1996 मधील एक प्रसंग सांगितला. त्यावेळी ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्रातील मेळघाट येथे रस्ते नव्हते, कुठल्याही सोयी नव्हत्या. त्यावेळी त्यांनी जे होईल ते होईल मंत्रीपद गेलं तरी फरक पडत नाही, असे वक्तव्य केले होते. पण आपण सांगितलेल्या या प्रसंगाची मोडतोड करुन हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
आपल्या राजकीय स्वार्थासाठी काही लोकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यस करुन चुकीची माहिती पसरवण्याची मोहीम राबवल्याचे म्हणत नितीन गडकरी यांनी संपूर्ण व्हिडिओबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community