मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी दुपारी ट्रॅफिक ब्लॉक

140

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील किवळे गावाजवळ ( मुंबई दिशेने ) ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्यावतीने शुक्रवारी २६ सप्टेंबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे. या कामासाठी दुपारी १२ ते १४ या कालावधीत वाहतूक किवळे ते देहु रोड मार्ग ( राष्ट्रीय महामार्ग ४८) सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव पथकर नाका मार्गे मुंबई अशी वळवण्यात येणार आहे.

( हेही वाचा : सरकारकडून मुंबईकरांना दिलासा; मालमत्ता करात आणखी वर्षभर वाढ नाही )

वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी संपर्क

या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई –पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्रमांक 9822498224 वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्यावतीने करण्यात अले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.