पुढच्या वर्षीच्या शेवटी मेट्रो ३ सुरू होईल, आमचा यात अजिबात इगो नाही, मुंबईच्या हितासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. रात्री झाडे कापली म्हणून मी मुंबईकरांची माफी मागायला तयार आहे. मेट्रोचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. ४०० कोटींच्या कार शेडसाठी २० हजार कोटींची गुंतवणूक रखडवून ठेवणार का, याचा आर्थिक भुर्दंड शेवटी मेट्रोच्या तिकिटावर पर्यायाने सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.
( हेही वाचा : महापालिकेच्या आणखी दोन उपायुक्तांची खांदेपालट… )
उद्धव ठाकरेंच्या सहमतीने आरे कारशेडचे २५ टक्के काम पूर्ण
विरोधकांच्या अंतिम आठवड्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस विधान परिषदेत बोलत होते. आरे कारशेडसाठी आरेची जागा पृथ्वीराज चव्हाण यांनी ठरवली होती, त्यासाठीचा मान्यता मी मुख्यमंत्री असताना मिळवल्या, तेव्हाही पर्यावरणवादी यांनी कांजुरचा पर्याय मांडला होता. त्यासाठी समिती स्थापन केली होती, त्या समितीने कांजूर हा पर्याय अव्यवहार्य असल्याचे म्हटले होते. यातील काही पर्यावरण वाद्यांचा मुंबईशी संबंध नाही, त्यांना कुठून कुठून पैसा येती हे तपासावे लागणार आहे. या पर्यावरण वाद्यांचा उच्च न्यायालय, ग्रीन ट्रीबुनल मध्ये पराभव झाला, सर्वोच्च न्यायालयानेही विरोध केला नाही. त्यामुळे रात्रीच झाडे कापली, त्याविषयी उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर केली होती आणि उद्धव ठाकरे यांच्या सहमतीनेच मेट्रोचे २५ टक्के काम पूर्ण केले.
आरे कारशेडमुळे २ लाख ६१ लाख कार्बनडाय ऑक्साईड कमी होणार
मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आरेवर कारशेडवर स्थगिती आणली, त्यांनी सौनिक समिती स्थापन केली, त्या समितीनेही कांजूर पर्याय अव्यवहार्य नाही, असे सांगितले. सरकारने त्या समितीवर समिती नेमली, त्या समितीने कांजूर मध्ये कार शेड उभारले तर ३-४ डेपोसाठी हा कारशेड वापरता येईल, असे सांगितले, वास्तविक त्यातील काही मेट्रोचे कामही सुरू झाले नाहीत, आरे येथील कारशेडमुळे २ लाख ६१ लाख कार्बनडाय ऑक्साईड कमी होणार आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community