भारतात 12 ऑक्टोबरला सुरू होणार 5G सेवा

164

देशात आगामी 12 ऑक्टोबरपर्यंत 5-जी सेवा सुरु होतील अशी माहिती केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5-जी सेवा सुरु करण्यात येणार आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले. देशभरात 5-जी सेवा सुरु झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्या टप्याने विस्तार करण्यात येणार असल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा : १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत एसटी प्रवासाचा लाभ)

भारतात 12 ऑक्टोबरला सुरू होणार 5G सेवा

याबाबत वैष्णव यांनी सांगितले की, आगामी दोन ते तीन वर्षांमध्ये देशभरात 5-जी सेवा पोहचण्याचे आमचे ध्येय आहे. 5-जी सेवा सर्वसामान्यांना परवडणारी असेल, याचीही आम्ही खात्री करू. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांकडे आम्ही लक्ष देत आहोत. भारतातील टेलिकॉम क्षेत्रात आगामी काळात मोठे बदल घडणार आहेत. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. भारतील टेलिकॉम क्षेत्राचा ग्लोबल बेंचमार्कसोबत ताळमेळ बसवण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. दूरसंचार ऑपरेटर त्या दृष्टीने काम करत आहेत. इन्स्टॉलेशनचे काम पूर्ण झाले आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत 5-जी सेवा सुरु होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर टप्या टप्यानं शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 5-जी सेवाचा विस्तार करण्यात येईल. 5-जी सेवा सर्वसामान्यांनाही परवडणाऱ्या किमतीमध्ये असेल, याची काळजी घेणार आहोत, असेही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले.

दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार, देशभरात 13 शहरात सर्वात आधी 5-जी सेवा उपलब्ध होणार आहे. या 13 शहरांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरु, चंडीगढ, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.