सोनाली फोगाट यांचा खुनच: पीएने रचला कट; दोघांना अटक

185

भाजप नेत्या आणि टिकटाॅक स्टार सोनाली फोगाट हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी फोगाट यांचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी या दोघांना अटक केली आहे. सोनाली फोगाट यांच्या शवविच्छेदनात त्यांच्या शरीरावर जखमा झाल्याचे दिसून आले होते. त्यावरुन सोनाली फोगाट यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून हत्या असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता.

सोनाली फोगाट यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल मिळाला असून, त्यामध्ये हा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या या संबंधी अधिक तपास सुरु असून या मृत्यूचे नेमके कारण काय याचा शोध घेतला जात आहे.

( हेही वाचा: पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले; हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून )

सोनाली यांना भाजपकडून हिसारमधून उमेदवारी देण्यात आली होती. रिआॅलिटी शो बिग बाॅसमुळेही सोनाली फोगाट चर्चेत आल्या होत्या. उत्तर गोव्यातील अंजुना येथील रुग्णालयात डाॅक्टरांच्या पथकाने त्यांना 23 ऑगस्ट रोजी मृत घोषित केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.