आयकर विभागाकडून महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापेमारी सुरु आहे. गुरुवारी आयकर विभागाने राज्यात 24 ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर शुक्रवारी आयकर विभागाचे पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्जुनवाडमध्ये आयकर विभागाने छापेमारी केली आहे. साखर कारखान्याच्या भागीदारीवरुन आयकर विभागाकडून कसून चौकशी केली जात आहे. सोलापूर, पंढरपूरसह अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीत कोल्हापुरातील भागीदारांच्या निवासस्थानावर हा छापा टाकण्यात आला आहे.
गुरुवारी अभिजीत पाटलांच्या साखर कारखान्यांवर छापेमारी
गुरुवारी आयकर विभागाने राज्यातील 24 ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर आता आयकर विभागाने आता आपला मोर्चा कोल्हापूरकडे वळवला आहे. कोल्हापुरातील अर्जुनवाडमध्ये आयकर विभागने छापेमारी केली आहे. दरम्यान, गुरुवारी साखर कारखानदारी क्षेत्रातले मोठे नाव असलेल्या अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या.
( हेही वाचा: आता संपलेला सेल सुद्धा विकता येणार, सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांचा होणार फायदा )
Join Our WhatsApp Community