राज्यातील काही जिल्ह्यांत कुपोषणाची समस्या तीव्र झाली आहे. त्यामुळे कुपोषण रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर समन्वय समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. लोढा म्हणाले, कुपोषणासंदर्भात राज्य सरकार गंभीर असून, त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पावले उचलली जातील. त्यासाठी आदिवासी विभाग, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य विभाग, अन्न व नागरी पुरवठा आणि स्थानिक लोक प्रतिनिधींची समन्वय समिती स्थापन केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
( हेही वाचा: काॅंग्रेसला धक्का: गांधी घराण्याचे निकटवर्तीय गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा दिला राजीनामा )
कुपोषण रोखण्यासाठी समन्वयाचा अभाव असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे समन्वय समिती स्थापन करून महिनाभराच्या आत संबंधित ठिकाणी कुपोषण रोखण्यासाठी तातडीची पावले उचलणार, अशी ग्वाही लोढा यांनी दिली. त्यासाठी स्वतः या भागांचा दौरा करून संपूर्ण यंत्रणा कामाला लावणार, असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community