डिजिटल तिकीटांचा वापर करणाऱ्यांना बेस्ट बसमध्ये प्रथम प्रवेश

211
‘टॅप इन टॅप आऊट’ बससेवेला प्रवाशांचा  प्रतिसाद वाढत असून डिजिटल प्रदान केलेल्या प्रवाशांना डिजिटल बसमधून प्रवास करण्यासाठी प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे. ३४ लाख ५०० बेस्ट प्रवाशांपैकी आजपर्यंत २५ लाखांहून जास्त प्रवासी बेस्ट चलो अॅपचा वापर करत असून आणि ४.५ लाखांहून अधिक प्रवासी डिजिटल तिकीट पध्दतीचा अवलंब करत असल्याचे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले आहे.
मुंबईकर प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी, कोरोना तसेच इतर तत्सम आजारांच्या पार्श्वभूमीवर संपर्कविरहित आणि सुरक्षित बसप्रवास देण्याच्या दृष्टीकोनातून तसेच डिजिटायझेशन प्रक्रियेला व डिजिटल तिकीट पध्दतीस चालना देण्याच्या हेतूने बेस्ट उपक्रमाने बेस्ट चलो अॅप, स्मार्ट कार्ड बस पास आणि एन.सी.एम.सी. सह बस पास योजनांचा शुभारंभ काही दिवसांपूर्वी केला आहे. यानंतर अडथळामुक्त प्रवासासाठी बेस्ट उपक्रमाने देशातील सर्वप्रथम अशा १००% डिजिटल टॅप इन टॅप आऊट बससेवेचाही  प्रारंभ केलेला आहे.
प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि वाढती मागणी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने ए ७७, ए १०२. ए-१०५. ए ११२. ए ११५. ए ११६. ए ११८, ए १२३. ए १६२. ए १६७, ए-३६९. ए-३७८, ए ४०१. ए-४०२, ए-विशेष ८ आणि ए-विशेष ९ अशा एकूण १६ बसमार्गावर सुमारे २०० बसगाड्यांमधून टॅप इन टॅप आऊट बससेवा नुकतीच सुरु केली आहे. बेस्ट चलो अॅप आणि स्मार्ट कार्ड वापरणा-या प्रवाशांना रांगेत वाट न पाहता अशा डिजिटल बसेसवेद्वारे गर्दीच्या वेळेतही प्रवास करण्याची अनुमती देण्यात आलेली असल्याचे बेस्टने म्हटले आहे.
बेस्टच्या ३४ लाख ५००  बेस्ट प्रवाशांपैकी आजपर्यंत २५ लाखांहून जास्त प्रवासी बेस्ट चलो अॅपचा वापर करीत असून आणि ४.५ लाखांहून अधिक प्रवासी डिजिटल तिकीट पध्दतीचा अवलंब करीत आहेत. त्यामुळे आज बेस्ट उपक्रम डिजिटायझेशनच्या बाबतीत संपूर्ण भारतातील प्रथम क्रमांकाची शहर परिवहन संस्था बनली आहे आणि भविष्यकाळात जास्तीत जास्त बसगाडया टॅप इन टॅप आऊट तंत्रज्ञानावर आधारित करण्याचा बेस्ट प्रशासनाचा मानस आहे. डिजीटल तिकीट प्रणालीला चालना देण्यासाठी बेस्ट फ्रिडम प्लॅन’ ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत वाढवण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत केवळ १ रुपयामध्ये कोणत्याही बसमार्गावर सात दिवसांच्या आत पाच वेळेला प्रवास करण्याची सोय आहे. तरी या योजनेचा फायदा जास्तीत जास्त प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. “प्रवाशांना जागतिक दर्जाच्या प्रवासाचा सुखद अनुभव देण्याच्यादृष्टीने बेस्ट उपक्रमाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे याचा लाभ सर्वच प्रवाशांनी घ्यावास असे आवाहन बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.