मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह केलेल्या उठावानंतर आता शिवसेनेत उभी फूट पडली आहे. असे असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला असून आता शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही एक मोठी घडामोड असल्याचे म्हटले जात आहे.
उद्धव ठाकरेंनी केले स्वागत
संभाजी ब्रिगेडचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या मुख्य प्रवक्त्यांनी आपण शिवसेनेला समर्थन देत असल्याची जाहीर घोषणा केली आहे. महाराष्ट्रात यापुढे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येऊन काम करतील, असेही जाहीर करण्यात आले आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया देत संभाजी ब्रिगेडचे स्वागत केले आहे. आपण सर्वजण शिवप्रेमी आहोत त्यामुळे आपण दोघं एकत्र येऊन नवा इतिहास घडवूया, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः मढमधील स्टुडिओ घोटाळ्याप्रकरणी भाजपचा आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्यावर आरोप)
प्रादोशिक अस्मिता टिकवण्यासाठी युती
प्रादेशिक अस्मिता आणि संविधान टिकवण्यासाठी आपण संभाजी ब्रिगेडशी युती करत आहोत. आजवर दुहीच्या शापाने आमचा घात केला. ही युती निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आलेली नाही. पण आगामी काळात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड हे एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जाण्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community