राणीबाग ‘श्रीगणेश चतुर्थी’लाही राहणार खुले

188

भायखळा पूर्व परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाची (राणीबाग) साप्ताहिक सुट्टी ही दर बुधवारी असते. मात्र, यापूर्वी महानगरपालिकेने मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या बुधवारी हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले असते. त्यानुसार येत्या बुधवारी म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२२ रोजी ‘श्रीगणेश चतुर्थी’ निमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. मात्र या सुट्टीच्या दिवशीही उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेच्या सुविधेकरिता खुले राहणार आहे. जेणेकरुन या सुट्टीच्या दिवशी लहान-थोरांना उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राणी, वनस्पती, पक्षी यांना बघता येईल व एकूणच तेथील पर्यावरणाचा आनंद घेता येईल.

गुरुवार, १ सप्टेंबर रोजी बंद असणार

बुधवारी जर सदर उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले असल्यास त्याच्या दुस-या दिवशी म्हणजे गुरुवारी ते बंद ठेवण्यात येते. यानुसार हे प्राणिसंग्रहालय गुरुवार, १ सप्टेंबर २०२२ रोजी जनतेकरता बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने कळविले आहे. हे उद्यान साप्ताहिक सुट्टीचा दिवस वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवशी नागरिकांसाठी खुले असते. त्या दिवशी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० या दरम्यान उद्यानाची तिकीट खिडकी सुरु असते. तर उद्यान सायंकाळी ६.०० वाजता बंद होते. या उद्यानात प्रवेशासाठी प्रती व्यक्ती रुपये ५०/- इतके शुल्क असून वय वर्ष ३ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी रुपये २५ /- इतके प्रवेश शुल्क आकारण्यात येते. विशेष म्हणजे आई – वडील आणि १५ वर्षे वयापर्यंतची २ मुले अशा ४ व्यक्तिंच्या कुटुंबासाठी रुपये १००/- इतके एकत्रित शुल्क आकारण्यात येते.

(हेही वाचा कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफ; राज्य सरकारचा निर्णय)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.